किरण माने प्रकरणी चॅनलने स्पष्टीकरण दिल्यानंतर अनिता दातेची पोस्ट चर्चेत

By  
on  

‘मुलगी झाली हो’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान नुकतंच या मालिकेत माऊच्या वडिलांची म्हणजे विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांची मालिकेतून हकालपट्टी करण्यात आली. या नंतर किरण माने यांनी आपल्याला राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून बाजूला केल्याचे म्हटले. तसेट कुठलीच पूर्वसूचना न देता कामावरुन काढून टाकल्याने त्यांच्या बाजूने सोशल मिडीयावर एक कॅम्पेनच चालवण्यात आला. हे प्रकरण प्रचंड चिघळलं. 

अनेक कलाकारांचा किरण माने यांना या प्रकरणात पाठिंबा मिळाला. दरम्यान मालिकेच्या निर्मात्यांनी मात्र किरण माने यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

दरम्यान, अभिनेत्री अनिता दाते हिने किरण माने यांच्यासाठी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. अनिता आपल्या पोस्टमध्ये म्हणते," मागिल 4 दिवसा पासून किरण माने ह्याला कोणतेही कारण न देता मालिकेतून काढून टाकण्यात आले असे तो सातत्याने विविध माध्यमातून सांगत होता. 
कलाकाराला त्याला त्याचे काम काढून घेताना ते का काढून घेतले हे विचारतोय तर ते त्याला सांगण्याचे सौजन्य त्या संस्थांनी दाखवले पाहिजे. ही माझी कलाकार म्हणून असलेली अपेक्षा मी मांडली. 
आज स्टार प्रवाह ह्या वाहिनीने लोकसत्ता मध्ये किरण माने ह्याला त्याच्या गैरवर्तणुकीमुळे काढले. त्याला त्या आधी समज दिली होती . हे देखील सांगितले. तसेच ,आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो हे स्पष्ट केलं ह्या बद्दल 
मी कलाकार म्हणून त्याचे मनापासून आभार मानते.
आपले विचार नेहमीच योग्य पध्दतीने आपण मांडले पाहिजे. व्यवस्थेला प्रश्न देखील विचारले पाहिजेत. कोणतीही दडपशाही नसावी असेच मला वाटते. 
काल पासून माझ्या पोस्ट वरील comment वाचतांना  मला अजून काही गोष्टी जाणवल्या . जसे की 
1.सभ्यता फार कमी लोकात असते. 
2.शिवी देणे चुकीचे आहे असं म्हणणारा माणूस त्याच वाक्यात शिवी देऊ शकतो. 
3.अनेक माणसे सभ्य भाषेत धमकी देतात. 
4.कोणी ब्राम्हण विरोधी बोलत असेल तर ब्राम्हण स्त्री ने त्याला सपोर्ट करायचा नसतो. त्या साठी टक्याची भाषा वापरतात. 
5.काय चूक काय बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करण्या पेक्षा आपण आपल्या जाती च्याच बाजूने बोलायला हवं. 
जात आता आम्ही मानत नाही असं म्हणताना छुप्या पद्धतीने जात मानायची असते .
अश्या अनेक गोष्टी ह्या नंतर देखील मला comment मध्ये वाचायला मिळतील. माणूस म्हणून मला समृध्द होण्यासाठी फारच मदत होईल. "

Recommended

Loading...
Share