By  
on  

'मुलगी झाली हो' मालिकेत हा अभिनेता घेणार किरण मानेंची जागा?

'मुलगी झाली हो' या  लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. एका बाप मुलीच्या नात्याची ही निरागस कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाते. परंतु सोशल मिडीयावर आपल्या ज्वलंत लेखणीमुळे प्रसिध्द असलेले किरण माने यांना स्टार प्रवाहवरील या मालिकेतून कुठलीच पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आलं, असं त्याचं म्हणणं. तर चॅनेलने निवेदन जारी करत किरण माने यांच्या महिलांसोबतच्या गैरवर्तवणुकीमुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं स्पष्टिकरण दिल. 

हा वाद आता बराच विकोपाला गेलाय. अनेत आरोप-प्रत्यारोप याप्रकरणी होत आहेत. तर याच मालिकेतील अनेक महिला सरहकलाकार या किरण मानेंच्या बाजूने उभ्या आहेत. तर इतर महिला कलाकार या त्यांच्याविरोधात. 

किरण माने यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने जिवंत केलेलं विलास पाटील ही व्यक्तिरेखा आता दुसरा अभिनेता साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांनुसार, , ‘मुलगी झाली हो’ मालिकेत अभिनेता आनंद अलकुंटे विलास पाटीलची भूमिका साकारणार आहे. सध्या तरी याविषयी प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही. आनंद याआधी ‘रुद्रम’ मालिकेत पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने ‘बंदिशाळा’, ‘जोगवा’ सारख्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Recommended

PeepingMoon Exclusive