By  
on  

शशांक केतकरचा आंबट- गोड ‘मुरंबा’, पाहा प्रोमो

होणार सून मी या घरची या लोकप्रिय मालिकेतील चॉकलेट हिरो श्री साकारुन अभिनेता शशांक केतकर हा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला. नाटक, सिनेमे आणि मालिका असा त्याच्या अभिनयाचा प्रवास सुरुच आहे. छोट्या पडद्यावरचा एक प्रसिध्द नायक अशी त्याची ख्याती आहे. पण नायकाच्या इमेजला तोडीस तोड असा  खलनायकसुध्दा शशांकने अलिकडे साकारला. त्याच्या या भूमिकेचंसुध्दा खुप कौतुक झालं. आता छोट्या ब्रेकनंतर अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

शशांक केतकर लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेतून आणि नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवरून या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून या प्रोमोवरून शशांक पुन्हा एकदा नायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजतं. या मालिकेचं नाव ‘मुरंबा’ असं असणार आहे. सध्या या प्रोमोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive