By  
on  

अभिनेते-खासदार डॉ.अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, टीकेचे होतायत धनी

मराठी मालिकाविश्वात आपल्या दमदार ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि राजकारणात सक्रीय असणारे खासदार-अभिनेते म्हणजेच डॉ.अमोल कोल्हे. महत्त्वाचं म्हणजे अमोल कोल्हे लवकरच एका आगामी सिनेमात नथुराम गोडसे ही व्यक्तिरेखा साकारतायत. व्हाय आय किल्ड गांधी असं या सिनेमाचं नाव असून. अमोल कोल्हे साकारत असलेल्या नथुरामच्या व्यक्तिरेखेविषयी त्यांनी सोशल मिडीयावरसुध्दा पोस्ट केली आहे. पण त्यानंतरच राजकीय आणि इतर वर्तुळातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जातंय. 

आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये अमोल कोल्हे लिहतात, " मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका: -२०१७ साली केलेला “Why I killed Mahatma Gandhi” हा सिनेमा प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.
कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा!
याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा! "

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

डॉ. कोल्हे यांनी या चित्रपटात काम करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न या निमित्ताने राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. '

अमोल कोल्हे यांच्या त्या भूमिकेकडे केवळ अभिनय आणि कलेच्या दृष्टीनेच पाहावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive