By  
on  

चंगा लग दा मैंनू ! म्हणत सईने शेयर केलं ग्लॅमरस फोटोशूट

मराठी सिनेसृष्टीतील  बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच एका हटके आणि स्टायलिश साडीतलं फोटोशूट शेअर करत सईने सर्वांचं लक्ष वेधून  घेतलं आहे. 

या ब्राऊन कलरच्या स्टायलिश साडीत सईच्या सोंदर्याला चार चांद लागले आहेत. सोबतच या फोटोशूटला सईने एक झक्कास कॅप्शनसुध्दा दिलं आहे. 

चंगा लग दा मैंनू ...अशा पंजाबी ओळी लिहत तिने हे फोटोशूट शेयर केलंय. 

सई नेहमीच आपल्या सुंदर अदाकारीने चाहत्यांची मनं जिंकते.

मराठी सिनेसृष्टीची फॅशनिस्टा म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाची परिक्षक असलेली सई या शोच्या विविध भागांसाठी हटके लुक्स कॅरी करते.

 

मराठीतली ही आघाडीची अभिनेत्री आता बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवतेय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive