By  
on  

हा मराठी अभिनेता होणार बाबा, म्हणतो 'लवकरच रंगमंचावर ..'

यंदा अनेक कलाकारांच्या घरी चिुकल्यांचं आगमन झालं आणि संपूर्ण घर आनंदाने न्हाऊन निघालं. मराठी मालिकाविश्वात आपल्या व्यक्तिरेखांनी छाप पाडणारा अभिनेता समीर खांडेकर यांने नुकतच सोशल मिडीयावरुन एक गोड बातमी शेयर केली आहे. तो लवकरच बाबा होणार आहे. त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचे फोटो नुकतेच त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे समीर खांडेकर आणि त्याच्या पत्नीवर चाहते व सेलिब्रिटी वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

डोहाळे जेवणाचे पत्नीसोबतचे खास फोटो शेयर करत समीरने त्याला एक हटके कॅप्शन दिलं आहे. म्हणतो, लवकरच रंगभूमीवर. समीरला सायली संजीव, तन्वी पालव, मयुरी देशमुख, स्पृहा जोशी, कुंजिका काळवीट, अन्विता फलटणकर, रेश्मा शिंदे, स्नेहल शिदम, ऋतुजा बागवे अशा अनेक अभिनेत्रींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 

अलिकडेच निरोप घेतलेल्या ती परत आलीय या रहस्यमय थरारक मालिकेत समीर खांडेकर   महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. तसंच वैजू नं १,  काहे दिया परदेस या मालिका आट्पाडी नाईट्स यांसारख्या सिनेमांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive