Birthday Special : आहे परी तर Don't worry ! मायरा वायकुळचे हे क्युट फोटो पाहा

By  
on  

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

 सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. आज मायराचा वाढदिवस आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त या गोड चिमुकलीबद्दल जाणून घेऊयात.

 

परी फेम बालकलाकार मायरा  नेहमीच सेटवरचे विविध व्हिडीओ शेयर करते. झी मराठीवरील या मालिकेमुळे मायरा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. मायराला यापूर्वी अनेक सोशल मिडीया व्हिडीओंमधून आपण पाहिलं आहे. 

मायरा वायकुळने टिक टॉक सारख्या व्हिडिओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिक टॉक स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner नावाने मायराचे चॅनल आहे. तिला इन्स्टा क्वीनही म्हणतात. 

मायराच्या  व्हिडिओंना लाखो हिट्स मिळताच शिवाय खुप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन चाहते प्रोत्साहित करतात.

 

 मायराचे सर्व अकाउंट तिची आई हँडल करताना पाहायला मिळते.

मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत मायराच्या नवनव्या कंटेंट्सना प्रोत्साहन देतात.

मायराच्या प्रत्येक क्युट अदांवर चाहते फिदा होतात. 

आता मायराला झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे ह्या दोन प्रसिद्ध कलाकारांसोबत छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळत आहे.

मायराच्या अभिनयाचं खुप कौतुक होत असून प्रेक्षक तिच्यावर प्रचंड प्रेम करतायत. 

 

 

Recommended

Loading...
Share