Photos : शाही थाटात विवाहबंधनात अडकले रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर

By  
on  

सारेगमप लिटील चॅम्प्स फेम गायक रोहित राऊत व गायिका जुईली जोगळेकर हे दोघंही रविवारी 23 जानेवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. पुण्यातील ढेपेवाडा येथे त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. 

 

सोशल मिडीयावर रोहित आणि जुईलीच्या लग्नाची गेले आठवडाभर  जोरदार चर्चा आहे. याशिवाय #Rohilee हे हॅशटॅगदेखील चर्चेत आलय.

 

 

ढेपेवाडा येथे पार पडलेल्या रोहिलीच्या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. 

 

 

 

रोहित आणि जुईली हे जवळपास 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं. आपलं प्रेम दोघांनी कधीच लपवून ठेवलं नाही. 

अनेक मालिकांसाठी त्यांनी एकत्र पार्श्वगायन केलंय. ते नेहमीच एकमेकांसोबत स्पॉट व्हायचे 

गेल्या अनेक दिवसांपासून रोहित-जुईलीच्या लग्नाच्या विविध विधींना सुरुवात झाली होती. ग्रहमख, साखरपुडा, मेहंदी, संगीत आणि आता लग्न असे विविध कार्यक्रम थाटात पार पडले. 

 

रोहित आणि जुईलीवर सध्या चाहत्यांकडून व सेलिब्रिटी वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

Recommended

Loading...
Share