लेक चालली सासरला! अभिनेत्री अलका कुबल यांच्या लेकीचा थाटात पार पडला विवाहसोहळा

By  
on  

मराठी सिनेसृष्टील सुप्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल यांच्या सिनेमांची व अभिनयाची मोहिनी प्रेक्षकांवर आजही आहे. लेक आणि सूनेच्या भूमिकेतून त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. आज त्यांचीच लेक सासरला गेली आहे. अलका कुबल यांची लेक ईशानीचा नुकताच थाटात लग्नसोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी जमली होती. 

सर्वच कलाकारांनी ईशानीच्या रिसेप्शन सोहळ्यात धम्माल केली, 

अभिनेत्री स्मिता जयकर, अभिनेत्री किशोरी शहाणे आणि अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी लग्नात एक झक्कास सेल्फ घेतला. 

. ईशानी ही अलका यांची मोठी मुलगी आहे. ईशानी अमेरिकेतील मियामी येथे पायलट आहे.ईशानी दिल्ली येथील निशांत वालिया यांच्याशी एंगेज झाली आहे. निशांतही ईशानीप्रमाणेच मियामी येथे पायलट आहे. ईशानीने 2015मध्ये पायलटचं प्रशिक्षण घेतलं आहे.

 

 

मागच्याच वर्षी त्यांचा रोका सेरेमनी पार पडला होता. 

 

अशोक शिंदे, प्राजक्ता दिघे, अर्चना नेव्हरेकर आणि मिलिंद गवळी .या कलाकारांचा रिसेप्शनमधील सुंदर फोटो

 

Recommended

Loading...
Share