By  
on  

फ्रेंडशीप डे सेलिब्रेट करा रोहित-जुईलीच्या नवीन कव्हर साँगसह

मराठीतला रॉकस्टार रोहित राऊत आणि युथ सेन्सेशन जुईली जोगळेकरचं गेल्या महिन्यात ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’ हे पहिलं मॅशअप आल्यावर आता रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग रिलीज झालं आहे. इकोनेक्टवरून रोहित-जुईलीचं फ्रेंडशीप कव्हर साँग आलं आहे. ‘तेरा-यार हूँ मै- तेरी यारियाँ’ हे ह्या दोघांचे मॅशअप जेवढं सुमधूर आहे, तेवढाच गाण्याचा व्हिडीयोसुध्दा सुरेख चित्रीत केलेला आहे.

ह्या गाण्याविषयी रोहित राऊत सांगतो, “लोकाग्रहास्तव आम्ही पहिलं मॅशअप केलं. ते आमच्या चाहत्यांना एवढं आवडलं, की त्यांनी अजून एक गाणं गाण्याचा आग्रह धरला. म्हणून आता हे दुसरं कव्हर साँग घेऊन येतोय. आणि आमच्या चाहत्यांना वचन दिल्याप्रमाणे, अजुन काही कव्हर साँग घेऊन येण्याचा आमचा मानस आहे.”

https://www.youtube.com/watch?v=fjr8xpffSGk&authuser=0

गायिका जुईली जोगळेकर म्हणाली, “माझ्यासाठी आणि रोहितसाठी यंदाचा फ्रेंडशीप डे खास आहे. कारण आमच्या मैत्रीला यंदा एक दशक पूर्ण होत आहे. त्यामूळे दुसरं कव्हर साँग करताना मैत्रीविषयीचीच दोन गाणी आम्ही निवडली.”

यंदांचा फ्रेंडशीप डे रोहित-जुईलीच्या नवीन कव्हर सॉंगसह सेलिब्रेट करायला मजा येणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive