'आई कुठे काय करते' फेम तुमची लाडकी अरुंधती बालपणीसुध्दा दिसायची खुप गोड

By  
on  

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. मधुराणी साकारत असलेली अरुंधती देशमुख ही व्यक्तिरेखा आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातली ताईत आहे. या मालिकेचा चाहता वर्ग अफाट आहे. अरुंधती ही नायिका साकारणारी मधुराणी गोखलेचेसुध्दा असंख्य चाहते आहेत आणि या चाहत्यांसाठी मधुराणीने नुकतंच एक गोड सरप्राईज दिलं आहे. 

 

पूर्वी आणि आता या सोशल मिडीया ट्रेंडनुसार अरुंधतीने बालपणीचा फोटो शेयर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का  दिला आहे. तिचा हा फोटो खुप व्हायरल होतोय. यात तिने पांढ-या रंगाचा फ्रॉक परिधान केला असून स्टाईलमध्ये कमरेवर हात ठेवलाय. म्हणूनच या पोस्टला अरुंधतीने स्टाईल में रहनेका असं कॅप्शन दिलं. 

'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे अरुंधती साकारणारी मधुराणी गोखले- प्रभुलकर ही महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. 

Recommended

Loading...
Share