Lata Mangeshkar Health Update : लतादीदींच्या प्रकृतीमध्ये किंचीत सुधारणा

By  
on  

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची एक अपडेट नुकतीच मंगेशकर कुटुंबियांनी दिली आहे. लतादीदींच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ९२ वर्षांच्या लतादीदींना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना ८ जानेवारी रोजी दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

लतादीदींच्या  प्रकृतीवरुन सोशल मिडीयावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मध्यंतरी या अफवांचं बरच पेव फुटलं होतं. त्यामुळे दीदींच्या अधिकृत हॅण्डलवरुन त्यांच्या आरोग्याची माहिती कुटुंबियांनी देण्यास सुरुवात केली आहे. 

आता देखील लतादीदींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, 'लता दीदींच्या प्रकृतीतत किंचित सुधारणा झाली आहे. मात्र, अद्याप त्यांच्यावर आयसीयूमध्येच उपचार सुरू आहेत. कृपया दीदींच्या प्रकृतीविषयी खोट्या बातम्या पसरवू नका. त्यावर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.'

 

लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी लता दीदी लवकरच घरी परताव्यात यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचं आवाहन केल्याचंही अय्यर यांनी सांगितलं आहे. 

Recommended

Loading...
Share