प्रजासत्ताकदिनानिमित्त परी फेम मायराने शेयर केले खास फोटो

By  
on  

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

परी फेम बालकलाकार मायरा वायकुळ नेहमीच तिचं सुंदर फोटोशूट शेयर करते. यंदा आपला भारत अमृतमहोत्सवी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, देशभर तो उत्साहात साजरा होत आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळेल. यासोबतच भव्य परेडचेही आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने परीनसुध्दा आपल्या खास आणि गोड अंदाजात चाहत्यांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने परी फेम मायरा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु उर्फ चाचा नेहरु बनलीय. चाहते या गोड फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करतायत. 

Recommended

Loading...
Share