आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची मालिका आहे. या मालिकेच्या कथानकाने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश मिळवलंय. या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. या मालिकेत संजना ही खलनायिका प्रकारची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. नेहमीच मालिकेत टीकेची धनी होणारी संजना ऑन स्क्रीनप्रमाणे ऑफस्क्रीनसुध्दा प्रचंड स्टायलिश आहे. पण साडीवर तिचं जीवापाड प्रेम आहे. नुकतंच रुपालीने नऊवारी पैठणीत केलेलं फोटोशूट खुप व्हायरल होतंय.
गर्द निळ्या रंगाची नऊवारी पैठणी आणि त्यावर हिरवागार ब्लाऊज अशा लुकमध्ये रुपाली कमालीची सुंदर दिसतेय.
रुपाली सोशल मिडीयावर कायम सक्रीय असते.
आई कुठे काय करते मालिकेमुळे रुपालीवर होणारी भरमसाठ टिका हीच तिच्या कामाची पोचपावती आहे.
रुपालीने या गर्द निळ्या पैठणीवर त्या जरीप्रणाचे चंदेरी रंगाचे दागिने परिधान केल्याने तिचा लुक आणखी खुलून आलाय.
रुपालीचा हा दिलखेचक अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.
रुपालीच्या या खास फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत.