उर्मिलासोबतच्या नात्यावर अभिनेता आदिनाथ कोठारेने सोडलं मौन , जाणून घ्या

By  
on  

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या वा-यासारख्या पसरल्या होत्या.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरु आहेत. उर्मिलाने अलीकडेच छोट्या  पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तुझेच मी गीत गात आहे  मालिकेच्या माध्यमातून ती टीव्हीवर पुनरागमन करते आहे. तिने पुनरागमन करण्यासाठी स्वत:च्या पतीच्या प्रॉडक्शन हाऊसचा मार्ग सोडून दुसरा निवडल्याने त्यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये आणखी चर्चेला भर मिळण्याचे कारण म्हणजे आदिनाथने उर्मिलाला वाढदिवशी शुभेच्छासुध्दा दिल्या नव्हत्या. त्यामुळे चाहतेही बरेच नाराज झाल्याचे दिसून आले. तसंच आणखी एक कारण म्हणजे, पती आदिनाथचा चंद्रमुखी हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्या सिनेमाचं कुठलंच प्रमोशन पत्नी उर्मिलाने केलेलं नाही. उर्मिलासुध्दा एक उत्तम नृत्यांगना आहे. चंद्रमुखीच्या गाण्यांवर ती थिरकेल अशी प्रेक्षकांना आशा होती. पण तसं झालं नाही. 

 आदिनाथ आणि उर्मिलामध्ये काहीतरी बिनसलं आहे. याबाबतच्या अनेक चर्चा सध्या रंगल्या आहेत. पण नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

पण नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर आदिनाथ कोठारेने मौन सोडले आहे. त्याने एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “उर्मिला आणि माझ्यात सगळं काही छान सुरु आहे. आम्ही एकमेकांसोबत खूश आहोत. माझ्या आणि उर्मिलाबद्दल अशा अफवा पसरवणाऱ्या आणि चर्चा करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही ”, असे त्याने म्हटले.

तर उर्मिलाने यावर कुठलीच प्रतिक्रीया दिलेली नाहीय. त्यामुळे चाहते प्रचंड संभ्रमात आहेत, लवकरच दोघांमध्ये नमेकं काय सुरुय हे उलगडेल. 

Recommended

Loading...
Share