“माझ्या आयुष्यातील…” म्हणत राणादाने दिल्या पाठकबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

तुझ्यात जीव रंगला म्हणत पाठकबाई आणि राणा दा यांनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ख-या आयुष्यात साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. टीव्हीवरची ही लोकप्रिय जोडी आता रिअल लाईफमध्येसुध्दा लग्नबंधनात अडकतेय. अक्षया देवधरने घराघरांमध्ये पाठक बाईच्या नावाने एक वेगळी ओळख निर्माण केली. आज अक्षय देवधरचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त राणादा फेम हार्दिक जोशीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हार्दिक जोशी हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त त्याने सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत. यात त्याने तिच्या वाढदिवसानिमित्त डेकोरेशन केले आहे. त्यासोबत तिच्यासाठी त्याने दोन केकही आणले आहे. यात ते दोघेही छान रोमँटिक पोजमध्ये फोटो काढताना दिसत आहे.

या फोटोंना हार्दिकने फार हटके कॅप्शन दिले आहे. ‘माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय आणि मौल्यवान व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’, असे हार्दिक म्हणाला. त्याच्या या पोस्टवर अक्षयानेही ‘आय लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे.

 

Recommended

Loading...
Share