By  
on  

“दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्ध देशमुखने शेयर केली आठवण

 गेले अनेक दिवस अभिनेता प्रसाद ओक अभिनीत आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाची चर्चा सुरुय. अखेर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी सोशल मिडीयावर धर्मवीर संदर्भात एक पोस्ट शेयर करत लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

मिलिंद गवळींची खास पोस्ट

प्रसाद ओक तुझं खूप खूप कौतुक ,तुझं खूप खूप अभिनंदन, वीस पंचवीस वर्षांपूर्वी
आपण दोघांनी केलेल्या “ अथांग “नावाच्या सिरीयल पासून ते आत्ता धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या भूमिके पर्यंतचा तुझा प्रवास मी पाहिला आहे , खूपच कौतुकास्पद , यशस्वी आहे तो, very inspiring as well, आपला मित्र इतकं कसं छान काम करतो , याचा अभिमान वाटतो , दिग्दर्शन असो किंवा अभिनय असो तू अप्रतिमच काम करतोस. मागच्या आठवड्यात चंद्रमुखी पाहिला , इतका अप्रतिम सिनेमा फार दिवसात बघितला नव्हता आणि आता तर काय धर्मवीर सिनेमा उद्या रिलीज होतोय , पण तो रिलीज व्हायच्या आधीच सुपर-डुपर हिट झालाय असं तू समजच, कारण आनंद दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं होतं , आपल्या समाजामध्ये हिरो कोणाला म्हणावं , आदर्श कोणाला मानावं तर आनंद दिघे साहेब हे उत्तम उदाहरण आहेत आणि तू हुबेहूब आनंद दिघे साहेबांचा सारखा दिसला आहेस ( Actor Ben Kingsley Gandhi film दिसला तसा) तुझ्या अभिनयाची उंची मला माहिती आहे त्यामुळे सिनेमा अप्रतिमच असणारच, खूप खूप खूप शुभेच्छा मित्रा . माझे मित्र प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई तुमचा सुद्धा खूप अभिमान वाटतो, हा विषय निवडला आणि त्याला तुम्ही न्याय दिलात ,
धर्मवीर जा संपूर्ण टीमला माझा सलाम आणि शुभेच्छा

 

Recommended

PeepingMoon Exclusive