By  
on  

अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणतेय, "आता झोप उडणार ; सावध रहा"

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या 'वाय' सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुक्ताची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक पोस्टर शेयर केलं होतं. ज्यात मुक्ता हातात मशाल घेऊन कुणासोबत तरी लढण्याच्या तयारीत दिसत आहे. 

तिच्या या पोस्टर वरून मुक्ता हातात मशाल घेऊन नक्की कुणासोबत लढत आहे? याचे अनेक अंदाज लावले जात आहेत. तिच्या या सिनेमातील भूमिकेबद्दल अनेक प्रश्न पडलेले असताना या सिनेमाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Y The Film (@ythefilm)

'वाय' सिनेमाचा हा टिझर खूपच थरारक आहे. टीझर मध्ये मुक्ता अचानक झोपेतून जागी होते आणि तोंडाला रक्त लागलेला एक कुत्रा तिच्या दिशेने गुरगुरत येताना दिसतो. तो कुत्रा तिच्या बिछान्यावर पाय देऊन तिच्या जवळ जातो. 'आता झोप उडणार... आज तिची वेळ, आणि उद्या कदाचित तुमची... सावध रहा... ' असं कॅप्शन देत मुक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर हा उत्कंठावर्धक टिझर पोस्ट केला आहे

 दरम्यान 'वाय' या टायटल वरून या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive