हृताच्या बहुचर्चित 'अनन्या' सिनेमाचा टिझर प्रदर्शित!

By  
on  

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या 'अनन्या' सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हृता या सिनेमातून एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे तिचे फॅन्स खूपच उत्सुक आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

 

नुकताच या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. हृताने तिच्या सोशल मीडियावर या सिनेमाचा टिझर शेयर केला आहे. 'आपल्या स्वप्नांच्या आकाशात स्वैर भरारी घेणारी स्वच्छंदी अनन्या देशमुख आली आहे तुमच्या भेटीला... कसे करणार तिचे स्वागत सांगा कमेंट करून,' असं कॅप्शन तिने टीझर शेअर करताना दिलं आहे.

संपूर्ण टिझर मध्ये हृताचा चेहरा दिसत नसला तरी तिचा स्वच्छंदी आणि प्रेमळ स्वभाव टिझर मधून जाणवत आहे. या सिनेमातून हृता साकारत असलेल्या 'अनन्या'ची जिद्द आणि तिचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केलं आहे तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

Recommended

Loading...
Share