टाईमपास ३ मध्ये दिसणार हृताचा डॅशिंग अंदाज!

By  
on  

२०१४ मध्ये दिग्दर्शक रवी जाधव यांचा 'टाईमपास' हा सिनेमा तुफान गाजला होता. ज्यात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी दगडू-प्राजक्ता साकारले होते. त्यानंतर २०१५ मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच 'टाईमपास २' आला होता. ज्यात प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव यांनी अभिनय केला होता. त्यानंतर आता या सिनेमाचा तिसरा भाग सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रवी जाधव यांनी नुकताच 'टाईमपास ३' या सिनेमाचा टिझर शेयर केला आहे. आई बाबा आणि साईबाबा शप्पथ, आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात. पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक,' असं कॅप्शन देत रवी जाधव यांनी सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे.

'लहानपणी टाईमपास म्हणून झालेल्या लव्हपासून लग्नाच्या लोच्यापर्यंतची स्टोरी सगळ्यांनी पाहिली. पण त्या प्रवासात अजून एक गोष्ट होती. जी सांगायची राहिलीच ना रे,' अशा संवादाने या टीझरची सुरुवात होते. सुरुवातीला दगडू आणि प्राजक्ताची झलक दाखवल्यानंतर पालवीची धमाकेदार एंट्री होते. या पालवीच्या भूमिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळेचा डॅशिंग लुक दिसत आहे.

या सिनेमातून हृताचा कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळत आहे. त्यामुळे हृताचा हा रावडी लूक बघण्यासाठी तिचे अनेक चाहते उत्सुक आहेत. तसंच या टीझरवर अनेकांनी कमेंट्स करत सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचं म्हटलंय.

Recommended

Loading...
Share