By  
on  

मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद क्षण, सई ताम्हणकरचा ‘IIFA’ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून गौरव

मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद क्षण नुकताच आला. सिनेक्षेत्रातील सर्वौत्कृष्ट कामगिरीसाठी बहाल करण्यात येणा-या सर्वौच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या आयफा पुरस्कारांमध्ये एक मराठमोळं नाव चमकलं आणि तमाम मराठी प्रेक्षकांचा उर अभिमानाने भरुन आला. मराठीसोबतच बॉलिवूड गाजवणारी आपली बोल्ड आणि ब्युटिफुल सई ताम्हणकरला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच ‘आयफा’ (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. ‘मिमी’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीतून सईवर कौतुकाचा वर्षाव होतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IIFA Awards (@iifa)

 

यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आला होता. शनिवारी रात्री या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात सई स्टनिंग लुकमध्ये पाहायला मिळाली. 

 

 

दरम्यान ‘मिमी’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारात एका सरोगेट मदरची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉनने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. यात सई ताम्हणकर हिने क्रितीच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉन, पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले होते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IIFA Awards (@iifa)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive