By  
on  

'फिर से उड चला…' प्राजक्ता माळीच्या सोलो ट्रीपची गोष्ट

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची रंगत वाढते. अलिकडेच तिची प्रमुख भूमिका असलेल्या रानबाजार यावेबसिरीजने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पण प्राजक्ता या सिरीजच्या यशादरम्यान तिची सोलो ट्रिप एन्जॉय करतेय. हिमाचल प्रदेशमध्ये प्राजक्ता सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळाली. 

. एखाद्या ट्रॅव्हलरप्रमाणे प्राजक्ताची भटकंती सुरू आहे. प्राजक्ता माळीची ही पहिली सोलो ट्रीप आहे आणि सोलो ट्रीपसाठी (Prajakta Mali Solo Trip) तिने हिमाचल प्रदेशची निवड केली आहे.

तिने आणखी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये ती रोहतांग पास याठिकाणी किती उंचीवर पोहोचली होती याची माहिती दिली आहे. 'ती तिच्या सर्वाधिक उंचीवर..'(She is at her peak) असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने १३०५८ फूट उंचीवर पोहोचल्याची माहितीही दिली आहे. तरी सर्वात उंचीवर पोहोचता न आल्याचंही तिने म्हटलं आहे.

 

 

एकामागोमाग एक सुपरहिट प्रोजेक्टसमधून झळकणारी प्राजक्ता आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत तिची सोलो ट्रीप एन्जॉय करतेय हे पाहून चाहतेसुध्दा भलतेच खुश झाले आहेत. या ट्रीपसाठी तिने काही काळ महाराष्ट्राची हास्यजत्रामधून काही ब्रेक घेतलाय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive