प्राजक्ताने सांगितला रानबाजारच्या शूटींगदरम्यानचा किस्सा, "अनेकदा व्हायच्या जुलाब आणि उलट्या"

By  
on  

गेल्या अनेक दिवसांपासून मराठीत पहिल्यांदाच बोल्ड वेबसिरीजने प्रेक्षकांचं लक्षवेधून घेतलं ते म्हणजे रानबाजारने. सत्य घटनांवर आधारीत गांची ही सिरीजप्लॅनेट मराठीच्या या वेबसिरीजच्या ट्रेलर लॉंच पासून रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळीचा आत्तापर्यंत कधीही पाहिला नसेल इतका बोल्ड ्वतार या वेबसिरीजमधून समोर आला. अभिजीत पानसे दिग्दर्शित रानबाजार या वेबसिरीजचीच सगळीकडे चर्चा आहे.

आत्तापर्यंत रानबाजार या वेबसिरीजचे सहा भाग प्रदर्शित झाले आहेत. एकूण आठ भागांची ही सिरीज आहे. नेहमीच सोज्वळ भूमिकांमधन प्रेक्षकांसमोर येणा-या प्राजक्ता माळीला या वेबसिरीजमुळे ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. यात तिने रत्नाची भूमिका साकारली आहे.  पण ही सिरीज शूट करतानाचा एक थक्क करणारा अनुभव नुकताच तिने शेयर केला आहे. या वेबसीरिजसाठी प्राजक्ताने चक्क ११ किलो वजन वाढवलं आहे. हे वजन वाढवण्यासाठी तिला फार मेहनत करावी लागली. 

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, ,”जेव्हा मला वजन वाढवायचं होतं, तेव्हा मी शरीराला फार सवयी लावून घेतल्या होत्या. त्यानंतर माझं शरीर जास्त अन्न घेत नव्हतं. मी अतिप्रमाणात खात होते. त्यामुळे मला अनेकदा जुलाब, उलट्या व्हायच्या. माझे शरीर अतिरिक्त खाणे स्विकारत नव्हते. त्यामुळे त्यातून सर्व बाहेर पडत होते. पण हळूहळू मला सवय लावावी लागली.”

Recommended

Loading...
Share