आर्चीला परश्याने ठेवलंय हे खास नाव, त्याच नावाने मारतो हाक

By  
on  

सैराट या सिनेमामुले आर्ची- परश्याची जोडी तमाम महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत बनली.अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्याबद्दलचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते खुप उत्सुक असतात. ‘सैराट’ चित्रपटानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून पाहायला मिळतं. पण आकाश रिंकूला कोणत्या खास नावाने हाक मारतो याचा खुलासा त्याच्या एका पोस्टमधून झाला आहे.

रिंकूचा आठवा रंग प्रेमाचा हा हटके विषय असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठी रिंकूला शुभेच्छा देताना आकाशने एक खास पोस्ट शेयर केलीय, व तिला तो ज्या नावाने हाक मारतो त्याचा उल्लेखही केलाय. 

 

आकाशनं ट्रेलरची लिंक शेअर करताना आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘खूप साऱ्या शुभेच्छा राजगुरू’ या पोस्टमध्ये त्यानं रिंकूला टॅग केलं आहे. त्याच्या याच पोस्टमधून आकाश रिंकूला ‘राजगुरू’ या नावने हाक मारत असल्याचा खुलासा झाला आहे. रिंकूची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

Loading...
Share