सिध्दार्थ जाधवच्या वैवाहिक आयुष्यात वादळ? चर्चांना उधाण

By  
on  

मनोरंजनविश्वात सेलिब्रिटींचं लग्न जुळणं, ब्रेकअप, घटस्फोट होणं हे नवीन नाही.  कधी कधी या कानाची खबर त्या कानाला पोहचत नाही आणि अचानक काही सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची बातमी समोर येऊन धडकते. बॉलिवूडमधलं हे वारं आता मराठी इंडस्ट्रीतही पोहचलंय असं म्हणायला हरकत नाही. 

मराठी सिनेविश्वातील प्रसिध्द अभिनेता सिध्दार्थ जाधव आपल्या सिनेमांमुळे आणि त्यातील हटके भूमिकांमुळे नेहमीच प्रेक्षकांचा लाडका ठरतो. सिनेमांप्रमाणेच तो अनेक लोकप्रिय रिएलिटी शोज् असू दे किंवा मग बॉलिवूड सिनेमांमधील लक्षवेधी भूमिका असू दे आपली छाप नेहमीच सोडतो. याच आपल्या लाडक्या सिध्दूच्या वैवाहिक जीवनात वादळ आल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे.

 सिद्धार्थ जाधव आणि पत्नी तृप्ती जाधव यांच्यात काहितरी बिनसलयं अशी बातमी समोर येत आहे.  सिद्धार्थ जाधवच्या जवळच्या माहितीतील सूत्रांनुसार, गेले दोन वर्ष सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्यात खटके उडत होते. गेल्या काही दिवसांपासून ते एकत्रही राहत नाहीयेत. त्याच्या दोन मुली त्याच्या पत्नीसोबत राहत आहेत. दोघांमधलं वादाचं कारण मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आलयं.

अनेक सेलब्रिटी हे विभक्त झाले तरी मुलांसाठी त्यांच्या आनंदासाठी एकत्र आलेले पाहायला मिळतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. पण नुकतंच सिध्दार्थने दुबई ट्रिप केली. यात त्याने त्याच्या मुलींसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ शेयर केले.पण यात तृप्ती दिसली नाही. या बातमीतलं तथ्य तपासण्यासाठी दोघांचंही इन्स्टाग्राम चेक करण्यात आलं. यात दोघंही मुलींसोबत दुबईला गेले होते, पण एकमेकांसोबत त्यांचा एकही फोटो किंवा व्हिडीओ नाही. 

सूत्रांनुसार यावंर सिद्धार्थ आणि तृप्तीने काहीच वक्तव्य केलेलं नाहीये. त्यामुळे या दोघांचं नात बिनसलं आहे की, या अफवा आहेत हे आपल्याला येणारा काळच सांगले. 
2007 मध्ये सिद्धार्थ आणि तृप्ती लग्नबंधनात अडकले. या दोघांच लव्हमॅरेज आहे. खरंतर सिध्दार्थ जाधव या नावाला वलय प्राप्त होण्यापूर्वी तृप्ती त्याच्या प्रेमात पडली. तिने त्याच्या पडत्या काळात संघर्षात त्याला खंबीर साथ दिली. दोघांची लव्हस्टोरी खुपच हटके आहे. अनेक कार्यक्रमात त्यांचा जबरदस्त बॉंड दिसून आला आहे.  'नच बलिये' मध्ये दोघांनी घेतलेल्या सहभागानंतर त्यांच्यातील लव्ह बॉन्ड चाहत्यांपर्यंत पोहोचलं होतं.

Recommended

Loading...
Share