'तुझ्यात जीव रंगला' फेम राणा-अंजली यांची लगीनघाई ; याठिकाणी होणार लग्न!

By  
on  

तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घरघरांत पोचलेली आणि सर्वांच्याच गळ्यातला ताईत बनलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी. काही दिवसांपूर्वी 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतले सर्वांचे लाडते राणादा आणि पाठकबाई यांचा साखरपुडा झाला. त्याचे फोटोही सगळीकडे शेअर झाले होते. त्यामुळे सखरपुड्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या चर्चांना आता उधाण आले आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांना हा प्रश्न पडला असून त्यांचे लाखो चाहते दोघांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत. 

दरम्यान 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये हार्दिक आणि अक्षया यांनी हजेरी लावली होती, तेव्हा त्यांना लग्न कुठे करणार? असं विचारलं असता "आम्ही विराजस आणि शिवानीशी चर्चा केली. नुकतंच त्यांनी पुण्याला लग्न केलंय. आम्हीही पुण्यालाच लग्न करण्याचं ठरवत आहोत.' असं हार्दिक म्हणाला...

पुढे साखरपुड्याबद्दल हार्दिक म्हणाला, "तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे आम्ही भेटले. नंतर घराघरात पोहोचलो. या मालिकेच्या पार्श्वभूमीला कोल्हापूर होतं. तिथंच सगळं कथानक घडतं. म्हणून आम्ही तिथं साखरपुडा केला!" लग्नानंतर अक्षयानं एक गोष्ट बदलावी असं हार्दिकला विचारल्यावर हार्दिक म्हणतो, "अक्षया लगेच संतापते. तिला पटकन राग येतो. लग्नानंतर तिनं यात बदल करायला हवा."

दरम्यान हार्दिक जोशी सध्या झी मराठी वरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मलिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून अक्षयाने याआधी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. लवकरच हार्दिक आणि अक्षया लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नासाठी चाहते आतुर आहेत.

Recommended

Loading...
Share