घटस्फोटाच्या चर्चांवर सिद्धार्थ जाधवने सोडले मौन!

By  
on  

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि पत्नी तृप्ती यांच्या वैवाहिक आयुष्य आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच सिद्धार्थ जाधवच्या पत्नीने सोशल मीडियावरुन जाधव हे आडनाव हटवल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. यावर आता स्वतः सिद्धार्थने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

'हिंदुस्तान टाइम्स' या इंग्रजी वृत्तपत्राच्या एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थला काही खासगी प्रश्न विचारण्यात आले होते. सुरुवातीला त्याने यावर बोलणे टाळले. त्यानंतर नाराज झालेल्या सिद्धार्थने "तुम्हाला अशी माहिती कुणी दिली आणि कुठून मिळाली" असे तो म्हणाला. पुढे संतापून, "अशा अफवा कोण पसरवतं मला माहिती नाही. आम्ही दोघेही एकत्र आहोत आणि आमच्यामध्ये सगळं ठिक आहे." असं सिद्धार्थ जाधव म्हणाला. 

सिद्धार्थ जाधव नुकताच आपल्या मुली आणि पत्नीसोबत दुबईला फिरायला गेला होता. तिथले काही फोटोस् त्याने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र या फोटोंमध्ये फक्त त्याच्या मुली होत्या. त्याने पत्नीसोबतचा एकही फोटो शेअर केला नाही. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांच्यात काहीतरी बिनसले असल्याचा अंदाज लावला होता. तसेच सिद्धार्थची पत्नी तृप्तीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे जाधव नाव बदलून अक्कलवार केले. त्यामुळे या सर्व चर्चांना उधाण आले.

दरम्यान सिद्धार्थ आणि तृप्ती यांचा प्रेमविवाह झाला असून त्यांना स्वरा आणि इरा अश्या दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्तीनं 'झलक दिखला जा' या शोमध्ये सहभाग घेतला होता. तसेच या शोमधील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Recommended

Loading...
Share