By  
on  

अभिनेता सुबोध भावे करतोय त्याच्या आवडत्या गावी सिनेमाचं शुटींग!

नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन अश्या तिनही क्षेत्रांत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा कलाकार म्हणजे अभिनेता सुबोध भावे. अभिनेता सुबोध भावे कट्यार नंतर आणखी एका सिनेमाचं दिग्दर्शन करत असून या सिनेमाच्या शूटिंगला त्याने सुरुवात केली आहे.

या सिनेमाच्या शूटिंगसाठी तो त्याच्या आवडत्या गावी गेला आहे आणि त्याचं हे आवडतं गाव म्हणजे साताऱ्यातील वाई. सध्या सिनेमाचं शूटिंग हे वाई मध्ये सुरू आहे. 'आवडत्या गावात शूटिंग असणं या सारखा आनंद नाही', असं म्हणतं सुबोधनं त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर वाईतल्या काही सुंदर लोकेशन्सचे काही फोटोस् सुद्धा सुबोधनं शेअर केले आहेत. 

अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शित नवा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक म्हणून सुबोधचा हा एक वेगळा प्रयत्न असल्याचं त्यानं म्हटलं आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी सिनेमाचं लेखन केलं आहे, तर नितीन वैद्य यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचं नाव मात्र सुबोध अद्याप गुलदस्त्यात ठेवलं आहे

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive