By  
on  

या मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं फेसबुक अकाउंट झालं हॅक!

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे या कलाकाराचं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. याबाबत त्याने तक्रार दाखल केली असून सध्या पेज रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हेमंतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती चाहत्यांना दिली.

अभिनेता हेमंत ढोमे यांचं फेसबुक पेज हॅक झालं असून त्याच्या नावात बदल केल्याचं दिसून येत आहे. याविषयी माहिती मिळताच हेमंतने तात्काळ इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. तसंच या पेजवर शेअर करण्यात आलेली कोणतीही पोस्ट अधिकृत समजू नका, असं आवाहन देखील त्याने केलं आहे.

"माझे facebook अकाऊंट हॅक झाले आहे... संबंधित पेजवर पोस्ट होणारी कोणतीही पोस्ट तूर्तास अधिकृत समजू नये. पेज रिकव्हरी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.... लवकरात लवकर पेज पूर्ववत होईल अशी आशा...धन्यवाद!", असं म्हणत हेमंतने इन्स्टावर पोस्ट शेअर केली आहे.

 

लॉकडाऊन नंतर रिलीज झालेल्या हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या सिनेमाला भरपूर यश मिळाले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं होतं. नुकताच या सिनेमाचा टेलिव्हिजन प्रीमियर दाखवण्यात आला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive