'फुलावरती फिरत असतो भुंगा...' होणाऱ्या नवऱ्यासाठी अक्षयानं घेतलेला हा उखाणा ऐकलात का?

By  
on  

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घरघरांत पोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे पाठक बाई आणि राणादा, अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी. तुझ्यात जीव रंगला म्हणत राणा आणि पाठक बाईं आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच हार्दिक आणि अक्षया यांचा साखरपूडा पार पडला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून सगळेच आश्चर्य चकीत झाले होते आणि आता ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. 

नुकताच अक्षयानं एका फॅमिली प्रोगामला हजेरी लावली होती. तेव्हा सर्वांच्या आग्रहामुळे अक्षयानं लाजत-लाजत हार्दिकसाठी खास उखाणा घेतला. तिच्या या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

"फुलावर फिरत असतो भुंगा त्याला हिंदीत म्हणतात भवरा, हार्दिक रावांच नाव घेते कारण तो आहे माझा होणारा नवरा". असा भन्नाट उखाणा अक्षयाने घेतला आणि तिच्या या उखाण्यानंतर सगळ्या पाहुण्यांनी जल्लोषात ओरडात टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं आहे.

दरम्यान हार्दिक जोशी झी मराठी वरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, तर अभिनेत्री अक्षया देवधर हिने काही दिवसांपूर्वी 'हे तर काहीच नाही' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.

Recommended

Loading...
Share