'आयुष्यात पहिल्यांदाच वारी अनुभवायची संधी मिळाली..' ; स्पृहा जोशीने शेयर केला तिचा पहिला वारी अनुभव!

By  
on  

मालिका, नाटक, सिनेमा, रियालिटी शोज् मधून घरघरांत पोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी. मालिका, नाटक आणि रियालिटी शोज् मधून स्पृहाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

अभिनेत्री स्पृहा जोशी हिचा स्वतःचा एक युट्युब चॅनल असून या चॅनेल वर ती तिचे विविध कार्यक्रम किंवा उपक्रम चाहत्यांसोबत शेयर करत असते. दरम्यान स्पृहाने तिचा आषाढ वारीचा पहिला अनुभव तिच्या चाहत्यांसोबत शेयर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने या पहिल्या वारीचा अनुभव सांगितला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री कॅप्शन दिलं आहे की, 'आयुष्यात पहिल्यांदाच वारीचं, पालखीचं वातावरण अनुभवायची संधी मिळाली.. पूर्ण वेळ मी आसपासचे हरिभक्तीत लीन झालेले चेहरे नुसती बघत राहिले होते.. ओढ, समर्पण, असोशी, तळमळ.. सगळे कागदावरचे शब्द.. काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली.. पांडुरंग हरी'.

स्पृहाचा हा वारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचे चाहते तिच्या या नव्या उपक्रमाचं कौतुक करत आहेत आणि या यानिमित्ताने वारीचा अनुभव घेता आला अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर केल्या आहेत.

Recommended

Loading...
Share