By  
on  

निर्माते-दिग्दर्शक नीरज पाठक यांनी युध्दवीर मधुसूदन सुर्वे यांच्यावरील जीवनपटाची केली घोषणा!

"माझी खुकरी कुठे आहे?'' कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी अत्यंत शांतपणे विचारले, जाणीव आणि बेशुद्धीच्या सीमेवर असलेल्या सुर्वे यांना होत असलेल्या असह्य वेदनांमध्ये मॉर्फिन वेदना सहन करण्यास मदत करीत होते. याच स्थितीत त्यांनी खुकरी घेऊन स्वतःचा डावा पाय गुडघ्यापर्यंत कापला. आणि "आता मलमपट्टी करा," असे त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सांगितले तसेच  "पायात ताकद उद्याच येईल" असेही म्हटले. आणि डॉक्टरांना सांगितल्याप्रमाणे सुर्वे दोन पायांनी घरी निघाले. मात्र फरक फक्त एवढाच होता की, एक पायात जयपूर फूट होता, दुसऱ्या पायात लोखंडी रॉड आणि पोटात कृत्रिम आतडे होते. शत्रूने त्यांच्या शरीराला इजा केली होती, पण त्यांचा आत्मा मात्र नेहमीसारखाच होता!

लेखक-निर्माता-दिग्दर्शक नीरज पाठक अशा या युद्धवीराचे जीवन पडद्यावर आणण्यास सज्ज झाले आहेत. नीरज पाठक दिग्दर्शित या चित्रपटाची घोषणा सुर्वे यांच्या देशभक्तीने भारलेल्या शिवतर गावी करण्यात आली. यावेळी मराठा युद्धाचा नायक सुर्वे यांनी नीरज यांचा शाल देऊन सन्मान केला. "मधुसूदन सुर्वे यांच्यासारख्या शूरवीरांचे घर असेपर्यंत भारत नेहमीच स्वतंत्र राहील," असे भावनिक उद्गार नीरज पाठक यांनी यावेळी काढले. तसेच, सुर्वे यांनी हॉस्पिटलमध्ये पाय कापण्याच्या शस्त्रक्रियेनंतरही पत्नीशी बोलताना, फुटबॉल खेळताना दुखापत झाल्याचे फोनवर सांगितले आणि चार दिवसात चांगला होईन असे सांगितले होते. ही गोष्ट ऐकताना माझ्या पोटात खड्डा पडला होता असेही नीरज पाठक यावेळी म्हणाले. त्यांच्या सभोवती असलेल्या लोकांशिवाय कोणावाही ठाऊक नव्हते की ते मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत असेही नीरज पाठक म्हणाले

मधुसूदन सुर्वेंबद्दल अधिक माहिती :
मधुसूदन सुर्वे हे एक माजी पॅराकमांडो असून शत्रूच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी ते सीमेवर तैनात होते.  शत्रूच्या मागावर राहून सर्जिकल स्ट्राइकद्वारे शत्रूचा विध्वंस आणि शत्रूच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि दळणवळणाचा नाश करण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले होते. सुर्वे हे कट्टर देशभक्त फक्त मशीन गन चालवणे किंवा रॉकेट लाँचर चालवण्यासाठी नव्हते तर सुर्वे यांच्या रक्तात लहानपणापासूनच देशभक्तीचे वारे भिनले होते. देशभक्त असल्याने अर्धा पगार घेऊन सुर्वे सैन्यात भरती झाले होते. खेडच्या छत्रपती संभाजी राजे सैनिक शाळेतील शिवतर गावातील शहीद सुपुत्रांचा सन्मान करणाऱ्या हुतात्मा स्मारकारकडे तरुणांची पावले वळली होती.

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील शिवतर गाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती भारतीय सैन्यात भरती होण्याची परंपरा आजही कायम आहे. शिवतरमधील जवळजवळ प्रत्येक कुटुंबात सैन्यात जाऊन देशाची सेवा करणारे पुरुष आहेत, युद्धनायक मधुसूदन सुर्वे यांच्या वंशजांनीही लष्करी गणवेश परिधान केला होता. पहिल्या महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय सैनिकांमध्ये १८ शूर सैनिक या गावातील सुपुत्र होते. आणि आजही बहुतांश रहिवासी लष्करात सेवा बजावत आहेत. गावातील हायस्कूलमध्ये महाराष्ट्रातील वीर किल्ल्यांची नावे असलेले वर्ग आहेत. फिट राहाणे हा येथील एक नियम असून तरुणांना सैन्य, पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रात सेवा करण्याचा अभिमान आहे.

तत्कालीन ब्रिटीश सरकारने शिवथर येथे शहीद सैनिकांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी त्यांचे शौर्य स्मारक उभारले, सैनिकांचे शौर्य नीरज पाठक आणि कमांडो सुर्वे यांनी पाहिले आहे. या गावातील बहुसंख्य मुले आजही भारतीय सैन्यात सेवा देत आहेत; खरं तर, कमांडो सुर्वे यांच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्या लष्करात आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांना भारतीय सैन्यात भरती होण्याची संधी मिळाल्याचे गावकरी अभिमानाने सांगतात. खरं तर, गावातील हायस्कूलमध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या नावाने वर्ग, सुस्थापित फिटनेस क्लब आहेत आणि सर्व विद्यार्थी आपल्या देशाची सेवा करणार्‍या सैनिकांच्या प्रतिभेचा आदर करतात. केवळ लष्करच नव्हे, तर गावातील तरुण पोलीस दल आणि वैद्यकीय क्षेत्रातही देशसेवा करत आहेत. अशा या सैनिकांच्या गावातून आलेल्या, कमांडो सुर्वे यांनी केलेली देशाची सेवा आणि कमांडो म्हणून दाखवलेले कौशल्य सगळ्यांना ठाऊक आहे. आसाममधील ऑपरेशन गेंडा, जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक, कारगिलमधील ऑपरेशन विजय, नागालँडमधील ऑपरेशन ऑर्किड आणि मणिपूरमधील ऑपरेशन हिफाजतमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले आहे, जिथे त्यांनी आणि त्यांच्या टीमने ३२ हून अधिक अतिरेक्यांना यमसदनी पाठवले. मणिपुरच्या चकमकीत सुर्वे जखमी झाले होते आणि त्यांनी पायही गमावले होते. सुर्वे दक्षिण आफ्रिकेतील काँगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेवरही होते. त्यांच्या कुटुंबाची पुढची पिढीही देशसेवेसाठी कार्यरत आहे. त्यांचा मुलगा एनडीएची तयारी करत असून मुलगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे.

सुर्वे यांना २००५ मध्ये मणिपूरमध्ये नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढ्यात असामान्य शौर्य दाखवल्याबद्दल शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. या घटनेनंतर सहा वर्ष आणखी सेवा केल्यानंतर ते २०११  मध्ये निवृत्त झाले. देशभक्त सुर्वे त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहेत. "युद्धात फक्त विजेते असतात, उपविजेते नसतात. सैनिक एकतर तिरंगा फडकावतो किंवा त्यात गुंडाळून परत येतो. मधुसूदन सुर्वे यांचे शौर्य थक्क करणारे आहे, त्यामुळेच मी त्यांच्या बायोपिकचे हक्क घेतले. हा चित्रपट, बायोपिक नसून एक काल्पनिक कथा असावी असे त्यांचे शौर्य पाहिल्यानंतर प्रेक्षकांना वाटेल,"  असेही नीरज पाठक यावेळी म्हणाले

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive