रिंकू राजगुरूने केली पहिल्यांदाच कविता ; कवितेचा व्हिडीओ पाहिलात का?

By  
on  

सैराट फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सैराट नंतर कायम चर्चेत राहिली आहे. सैराट सिनेमा नंतर तिने मराठीसह हिंदी सिनेमांत देखील झळकली. बॉलिवूड मधल्या अनेक मोठ्या दिग्दर्शकांच्या सिनेमात तिने अभिनय केला.

पण एक उत्तम अभिनेत्री सोबतंच रिंकू राजगुरू ही एक कवयित्री देखील आहे आणि तिच्या या पहिल्या कवितेचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावरून शेयर केला आहे. रिंकुची ही कविता ऐकून तिचे चाहते देखील सैराट झाले आहेत. 

'जब वो नहीं होता है तो खाली कमरा बहुत कुछ केहता है...
शायद उसकी ना होने की वजह होने की वजह होगी की उसें में मेहसुस करू..
अपने अंदर झांककर देखू तो वो वही होता हैं मेरे भीतर' अशी ही रिंकुची कविता सध्या चांगलीच वायरल होत आहे.

दरम्यान तिच्या या कवितेच्या व्हिडीओवर चाहत्यांनी वाह.. कविता पण करता का?, लयभारी, अप्रतिम, सुंदर अश्या अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर खूप सारे लाईक्स देखील दिले आहेत.

Recommended

Loading...
Share