By  
on  

"राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण" ; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर अस्ताद काळेची पोस्ट चर्चेत!

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होणाऱ्या राजकीय घडामोडींवर सामान्य जनतेपासून अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटीस् पर्यंत प्रत्येक जण व्यक्त झाले. प्रत्येक जण आपापली मते मांडत होता. इतक्यातचं काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान त्यांच्या राजीनाम्यावर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत प्रतिक्रिया दिली आहे. नुकतंच या संपूर्ण घटनेवर अभिनेता आस्ताद काळे याने देखील भाष्य केले आहे. 

अभिनेता आस्ताद काळे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध मुद्द्यांवर त्याची वैयक्तिक मत मांडताना दिसतो. नुकतंच आस्ताद काळे याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. "महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण….." , असे आस्ताद काळने म्हटले आहे.

दरम्यान अस्तादच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स मध्ये मते व्यक्त केली आहेत. "महाराष्ट्रातील ED कार्यालय आता बंद होतील….आता ED वालेही बेरोजगार..", अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने "मुख्यमंत्री पदाबरोबरच विधानपरिषदेच्या सदस्य पदाचा देखील राजीनामा…साहेब हा महाराष्ट्र आपला कायम ऋणी असेल…", अशी कमेंट केली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive