'धर्मवीर' साकारणाऱ्या प्रसाद ओकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोटो शेयर करत दिल्या शुभेच्छा!

By  
on  

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकिय नाट्यावर अखेर पडदा पडला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर सामान्य जनते पासून ते कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. नुकतंच अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने एकनाथ शिंदेंना खास फोटो शेयर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसाद ओक याने नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने दोन खास फोटोदेखील शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकनं धर्मवीरच्या ट्रेलर लॉंचच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो पोस्ट केलाय तर दुसरा फोटो हा धर्मवीर चित्रपटातील आहे. यात एकनाथ शिंदे हे एका मंदिरात देवासमोर हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. हे दोन्ही फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहे.

या फोटो सोबत प्रसादने "मा. मुख्यमंत्री… श्री. एकनाथजी शिंदे साहेब… मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा…!!!", असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान त्याच्या या  फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'धर्मवीर' या सिनेमानिमित्त अभिनेता प्रसाद ओक आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच प्रसाद ओकने यांच्यासोबतचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

Recommended

Loading...
Share