दृष्ट लागण्या जोगे सारे! सिद्धार्थ आणि मितालीचं स्वप्न साकार ; नव्या घरात केला प्रवेश

By  
on  

मराठीतील सेलेब्रिटी कपल म्हणून सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणारी जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. २०२१ मध्ये सिद्धार्थ-मितालीने मोठ्या दणक्यात लग्न केलं. त्यानंतर अवघ्या वर्षभरानंतर या जोडीने त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. या नव्या घराचे काही फोटो सिद्धार्थने शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ-मितालीने एक पोस्ट शेअर करत नवीन घर घेतल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर, आता या दोघांनी नव्या घरात गृहप्रवेश केला असून नुकतीच घराची वास्तुशांती केली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वास्तुशांतीचा एक सुरेख फोटो शेअर केला आहे.

दरम्यान सिद्धार्थ आणि मिताली यांचं जुनं घर हे आरे कॉलनीत निसर्गाच्या सानिध्यात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ते घराला निरोप देताना  जास्त भावनिक झाले. त्यामुळे सिद्धार्थ- मिताली यांनी जुन्या घराविषयीची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली होती.

आता सिद्धार्थ आणि मितालीने नवीन घर घेतल्यामुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Recommended

Loading...
Share