'अंबाबाईचं दर्शन घेतलं की सगळं छान होतं..' म्हणत धनश्री काडगावकरने शेयर केले खास फोटो!

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतून घरघरांत पोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. या मालिकेतील धनश्रीची वाहिनीसाहेब ही भूमिका प्रचंड गाजली.

अभिनेत्री धनश्री काडगावकर ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. धनश्री सोशल मीडियावर तिचे काही फोटोस आणि व्हिडिओस् शेयर करत असते. नुकतंच तिने अंबाबाईच्या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

या फोटोखाली तिने "कोल्हापुर ला जाऊन अंबाबाई च दर्शन नाई घेतलं तर काय अर्थय ????" असं कॅप्शन देखील पोस्ट केलं आहे.

"अंबाबाई चं दर्शन घेतलं की सगळ छान होतं असा माझा पहिल्यापासुनचा विश्वास आहे…म्हणून इथे आल्यावर सगळ्यात आधी अंबाबाई चं दर्शन घेतलं." असं ती या फोटोखाली कॅप्शन मध्ये म्हटली आहे.

दरम्यान धनश्रीला कबीर नावाचा एक लहान मुलगा असून त्याचे काही हटके फोटो देखील ती सोशल मीडियावरून शेयर करत असते.

Recommended

Loading...
Share