By  
on  

सुबोध भावे दिग्दर्शित सिनेमाची झाली घोषणा ; अधिक जाणून घ्या

मराठी कलाविश्वातील एक उत्तम कलाकार म्हणून अभिनेता सुबोध भावे कडे पाहिलं जातं. 'बालगंधर्व', 'डॉ. काशिनाथ घाणेकर', 'लोकमान्य एक युगपुरुष', 'कट्यार काळजात घुसली' अश्या अनेक उत्कृष्ट सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका करत सुबोध भावेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सुबोध भावे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाचं दिग्दर्शन केल्यानंतर तो आता पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. सुबोधने काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली होती. मात्र त्यावेळी त्याने "संहितेवर काम केल्यानंतर शूटसाठी तयार" असं म्हणत सिनेमाचं नाव काय असेल? कथा काय असेल? आणि या सिनेमात कलाकार कोणकोण असतील? याबद्दल सुबोधने "बाकी सहप्रवासी पुढच्या काळात समोर येतीलच.." असं म्हटलं होतं

नुकतंच सुबोधने त्याच्या या सिनेमाच्या नावाची घोषणा केली असून सिनेमाचं नाव 'मारवा' असं आहे. सुबोधने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात स्वतः सुबोध, अभिनेत्री सायली संजीव, लेखक वैभव जोशी आणि निर्माते नितीन वैद्य यांनी हातात 'मारवा' लिहलेलं पोस्टर घेतलं आहे.

या पोस्टखाली सुबोधने "मनातलं गूज, डोळ्यांतलं पाणी
अबोलीच्या वाटेवर, चाफ्याची निशाणी
भेटींचे तराणे, चुकामुकींची विराणी
"मारवा"
एक हुरहूर लावणारी कहाणी.' असं गोड कॅप्शन देत "मी दिग्दर्शित करीत असलेल्या आमच्या नवीन सिनेमाचं नाव जाहीर करत आहे.
"मारवा" असं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याने मारवा सिनेमाचे लेखक वैभव जोशी आणि निर्माते नितीन वैद्य यांना टॅग केलं आहे. 

 

या सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून सायली संजीव असणार आहे, असं दिसतंय. कारण सायलीने सुद्धा तिच्या सोशल मीडियावरून या सिनेमाचं पोस्टर शेयर केलं आहे. दरम्यान सुबोधने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली असून बऱ्याच काळानंतर सुबोध पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून आगमन करत आहे त्यामुळे सुबोधचा मारवा सिनेमा कधी प्रदर्शित होईल? यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive