'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर' ; प्रार्थना बेहरेचं नवीन फोटोशूट पाहिलंत का?

By  
on  

मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहरेला ओळखले जाते. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील नेहा कामत या भूमिकेतून प्रार्थना प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटोस शेयर करत असते.

नुकताच तिने ब्राऊन रंग असलेला एक ड्रेस घालून फोटोशूट केलं आहे.

या फोटोसला तिने 'प्यार तेरा, प्यार मुझे खीचे तेरी ओर' असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोस मध्ये प्रार्थनाचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज दिसत आहे.

प्रार्थनाच्या या फोटोसवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.

मालिकांबरोबरच 'कॉफी आणि बरेच काही', 'मितवा', 'मिस्टर आणि मिसेस सदाचारी', 'व्हाट्सअप लग्न' या मराठी चित्रपटांतही प्रार्थना झळकली होती.

Recommended

Loading...
Share