लंडनच्या टॉवर ब्रिजवर सोनाली आणि फुलवाचा बेभान डान्स ; व्हिडीओ वायरल!

By  
on  

महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आगामी तमाशा लाईव्ह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमातील गाणी खुपचं लोकप्रिय होत आहेत. या सिनेमातील 'रंग लागला' या गाण्याने सर्वत्र सुपरहिट झालं असून या गाण्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच थिरकत आहेत. या गाण्याच्या अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

नुकताच सोनाली कुलकर्णी आणि कोरिओग्राफर फुलवा खामकर या दोघींनी लंडनच्या प्रसिद्ध टॉवर ब्रिजवर बेभान होऊन डान्स केला आहे. 

त्यांचा हा रील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'तुला तर मानलंचं पाहिजे ,खरंच तू भारी आहेस एकदम' अशी कमेंट कुशल बद्रिकेने केली आहे तर 'सो ब्युटीफुल' म्हणत अभिनेत्री अमृता सुभाषने देखील त्यांच्या या डान्स व्हिडिओचं कौतुक केलं आहे. अश्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

 

दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि सचित पाटील यांच्यासह सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला तमाशा लाईव्ह हा सिनेमा येत्या १५ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

Recommended

Loading...
Share