गोव्याच्या किनाऱ्यावर दिसला बिगबॉस फेम स्नेहा वाघचा हटके अंदाज

By  
on  

बिगबॉस मराठी ३' या शोच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. कलाविश्वाप्रमाणेच स्नेहा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहे.

नुकतंच स्नेहाने तिचे गोव्यातील काही फोटोस सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या फोटोसमध्ये तिने व्हाईट गाऊन घातला आहे. तसंच डोक्यावर ब्राऊन कलरची हॅट देखील आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SSneha Wagh (@snehawagh)

या फोटोस सोबत तिने हटके कॅप्शन देखील टाकलं आहे. या फोटोखाली तिने 'माझ्या आईचे पूर्वज हे गोवन पोर्तुगीज होते आणि यावर विश्वास ठेवत मी त्यांचा वारसा पुढे चालवत आहे' असं म्हटलं आहे.

तिच्या या फोटोसवर चाहत्यांनी अनेक लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

'अधूरी एक कहाणी' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करुन तिने तिचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Recommended

Loading...
Share