By  
on  

संतोष जुवेकर म्हणतोय "दत्तक पालक व्हा" ; संतोषची 'ती' पोस्ट चर्चेत

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. संतोष जुवेकरचा अभिनयातला व्यासंग जितका दांडगा आहे तितकीच तितकीच सामाजिक जाण असल्याचे देखील वेळोवेळी दिसून आले आहे. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत संतोषने भावनिक आवाहन केलं आहे. संतोष जुवेकरने ‘दत्तक पालक’ व्हा असं आवाहन करणारी पोस्ट स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.

त्याने पोस्ट मध्ये लिहिलंय, "घरच्यांबरोबर, मित्रमैत्रिणींन बरोबर बाहेर कधी नुसतं जेवायला गेलो तरी ६ ७ हजार bill सहज येत. मग जर फक्त १० हजारात जर आपण एखाद्या मुलाचं/मुलीचं वर्षाचं अन्न नक्कीच पुरवू शकतो. वर्षातनं एखादी गोव्याची trip केली तरी २० २५ हजार सहज खर्च होतात आपले. मग फक्त १५ हजारात एखाद्या मुलाचा/मुलीचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च नक्कीच करून त्या मुलाचे/ मुलीचे दत्तक पालकत्व स्वीकारू शकतो आपण. आणि हे सगळं ज्यांना मनापासून करावंसं वाटतं आणि जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना कुठलीही अडचण नाही त्यांनी नक्कीच कराव पण मदत म्हणुन नाही तर कर्तव्य म्हणुन. आणि ही बळजबरी नाही."

केवळ मदतीच्या भावनेने नाहीतर कर्तव्य म्हणून मदत करावी असं असं म्हणत संतोष या पोस्टमधून प्रेरित करताना दिसत आहे. दरम्यान संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. त्याची धारावी बँक ही वेबसिरीज लवकरच समोर येणार असून त्याच्या आणखी एका सिनेमाचं नुकतंच शूटिंग सुद्धा संपल्याची पोस्ट त्याने शेअर केली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive