By  
on  

हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर वेबविश्वात डंका ; हिंदी वेबसीरिजमध्ये मिळाली भूमिका

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांवर प्रेम करतात. या कार्यक्रमामधील सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता आणि लेखक प्रसाद खांडेकर. याच प्रसादने आता एका हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

प्रसादने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने त्याची हिंदी वेबसीरिज प्रदर्शित झाली असल्याचं सांगितलं आहे. प्रसादने या पोस्टच्या कॅप्शन मध्ये म्हटलंय, “माझी नवीन हिंदी वेबसीरिज ‘मिया बिवी और मर्डर’ १ जुलैपासून एम.एक्स. प्लेयरवर प्रदर्शित झाली आहे. ही वेबसीरिज नक्की बघा आणि मला प्रतिक्रिया नक्की कळवा.” प्रसादने या वेबसीरिजमधील कलाकारासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

 

'मिया बिवी और मर्डर’ वेबसीरिजमध्ये राजीव खंडेलवाल, मंजीर फडणीस, रुशद राणा हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत. दरम्यान प्रसादने राजीव खंडेलवालबरोबर फोटो शेअर केला असून प्रसादने या वेबसीरिजमध्ये त्याने एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive