सैराट फेम तानाजी गलगुंडे रुग्णालयात दाखल ; 'या' आजाराशी देतोय झुंज

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतला मैलाचा दगड म्हणजे सैराट हा सिनेमा. या सिनेमातील आर्ची, परश्या, लंगड्या आणि सलीम या चौघांचा धडाकेबाज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले. मात्र या सिनेमातील लंगड्या फेम अभिनेता तानाजी गलगुंडे हा भाव खाऊन गेला. आर्ची परश्याच्या प्रेमाला साथ देणारा लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे आजही सर्वांच्या लक्षात आहे. याच तानाजी बद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.

तानाजी सध्या एका आजाराचा सामना करत असून काही दिवसांपूर्वी त्याला सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पोटात दुखत असल्याने त्याला त्रास होत होता, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती व्हायला सांगितले. तानाजीच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असून उपचारांनंतर तो ठणठणीत बरा होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान सैराट नंतर तानाजी प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने सैराटच्या कन्नड व्हर्जनमध्ये काम केलं. नंतर गस्त या सिनेमात देखील झळकला. नागराज मंजुळे यांच्या झुंड मध्येही तो होता. नुकताच त्याचा भिरकीट सिनेमाही आला आहे.

Recommended

Loading...
Share