Photos : 'नऊवारी आहे महाराष्ट्राची शान'; पाहा चिमुकल्या परीचा साजच न्यारा

By  
on  

व्रतवैकल्य व सणांचा महिना म्हणून श्रावणाला आपल्याकडे खुप महत्त्व आहे.  सगळीकडे मंगळागौरीचा उत्साह पहायला मिळत आहे. अशातच 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतही मंगळागौरची जय्यत तयारी सुरु असल्याचं पहायला मिळतंय. मंगळागौर निमित्त छोट्या परीनं पारंपारिक लुक केला आहे. 

हिरवीगार नऊवारी साडी, लाल रंगाचा ब्लाऊज आणि पारंपारिक दागिने यान छोटी परी खुपच गोड दिसतेय,

परीचा हा मराठमोळा साज सोशल मिडीयावर खुपच व्हायरल होतोय. 

परीनं म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ हिने फोटोंना कॅप्शनही खूपच सुंदर दिलं आहे. 'नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान', असं म्हणत क्युट परीनं हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. 

त 'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये मोठ्या उत्साहात मंगळागौर साजरी केलेली पहायला मिळणार आहे. 

 

मंगळागौरीचे खेळ खेळतानाचे काही छान व्हिडीओ मायराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेयर करण्यात आले आहेत. 

Recommended

Loading...
Share