अभिनय बेर्डे आणि बिग बॉस 15 विजेती तेजस्वी प्रकाशचा मराठी सिनेमा

By  
on  

बिग बॉस 15 ची विजेती आणि नागिन 6 ची हिट अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी सिनेमा मन कस्तुरी रे प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.  4 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तेजस्वी प्रकाशने आत्तापर्यंत संस्कार -धरोहर अपनों की, स्वरांगिनी- जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का, नागिन अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तेजस्वीच्या चाहत्यांसाठी तिचा हा मराठी सिनेमा एक ट्रीट असेल. तेजस्वी सोबत या सिनेमात अभिनय बेर्डे आहे.ती सध्या काय करते, अशी ही आशीकी आणि रम्पाट नंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक सिनेमाची त्याच्या फॅन्सना उत्सुकता आहे. 

चंचल मनाची प्रेमकथा, असं मन कस्तुरी रे सिनेमा बद्दल म्हणता येईल. सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन संकेत मानेनी (खारी बिस्कीटचा लेखक) केले आहे. तर अनेक वेगवेगळे मराठी सिनेमा आणणा-या नितीन केणी यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मुव्ही स्टुडिओजने याची प्रस्तुती केली आहे. मुंबई मुव्ही स्टुडिओज यांनी आत्तापर्यंत मराठीत लोचा झाला रे , शेरशिवराज, मल्याळममध्ध्ये पाथम वळवू असे वेगवेगळे सिनेमा आणले आहेत.तर निर्माते नितीन केणी गदर, रुस्तम, सैराट, शेरशिवराज-स्वारी अफजलखान या यशस्वी सिनेमांनंतर आता ‘मन कस्तुरी रे’ हा सिनेमा घेऊन येत आहेत.  त्याचबरोबर वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी मन कस्तुरी रे या सिनेमाची निर्मीती केली आहे. निशीता केणी आणि करण कोंडे हे या सिनेमाचे सहनिर्मीते आहेत. तर यूएफओ मूव्हीज या सिनेमाचे वितरक पार्टनर आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

Recommended

Loading...
Share