By  
on  

प्रसिध्द आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मराठी रंगभूमी, मालिका आणि सिनेमे अशा सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिध्द व ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले.चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख कमावलेले पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकाकडे वळले. मराठी सिनेमामध्येही त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.

 नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive