'तेरी मेरी यारी...' आता 'पुन्हा दुनियादारी'; संजय जाधव यांनी केली सिक्वेलची घोषणा

By  
on  

संजय जाधव दिग्दर्शित ंंदुनियादारी या सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. मल्टिस्टारर असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खुप भावला.  स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. आता नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. संजय जाधव यांनी  या चित्रपटाची घोषणा केली आहे. दुनियादारी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दिग्दर्शक संजय जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना हि माहिती दिली आहे. ते पोस्टमध्ये म्हणतात, " २०१३ साली प्रेक्षकांनी ज्या चित्रपटाला भरपूर प्रेम दिलं !
तेरी मेरी यारी ...चल करू दुनियादारी म्हणत प्रत्यक्षात ते मैत्रीचे क्षण आमच्या सोबत जगले. ते जग , ती मैत्री , ते प्रेम आणि तीच दुनियादारी आता पुन्हा घेऊन आलोत मैत्रीच्या नव्या ढंगात आणि प्रेमाच्या नवीन रंगात .

एका नव्या युगाची ,
नवीन रंगाची न्यु एज ईस्टमन कलर लव्हस्टोरी

तेरी मेरी यारी ... आता 'पुन्हा दुनियादारी' !!!  " 

 

 

संजय जाधव यांच्या पुन्हा दुनियादारीमध्ये आता कोणते कलाकार झळकणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.  

Recommended

Loading...
Share