पुन्हा एकदा 'ये गो ये मैना' वर अंकुश चौधरीचा धमाल डान्स ; पाहा हा व्हिडिओ

By  
on  

जत्रा सिनेमातील हिट गाण्यांपैकी एक हिट गाणं म्हणजे 'ये गो ये, ये मैना' हे गाणं. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यानं प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली. या गाण्यात अभिनेता अंकुश चौधरी एका वेगळ्या अंदाजात दिसला होता. दरम्यान अनेक वर्षांनी या गाण्यावर अभिनेता अंकुश चौधरी पुन्हा एकदा ठेका धरणार आहे.

अंकुशचा दगडी चाळ सिनेमाचा दुसरा भाग दगडी चाळ २ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अंकुश चौधरी विविध कार्यक्रमांना भेट देतोय. यावेळी त्याने कलर्स मराठीवरच्या 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा या कार्यक्रमातील एका स्पर्धकाने अंकुशचं ये गो ये मैना हे गाणं गायलं. यावर परीक्षक अवधूत गुप्तेने वन्स मोअर म्हणत अकुशला या गाण्यावर नाचण्याची विनंती केली. यावर अंकुशने देखील विनंतीला मान देत ये गो ये मैनाच्या गाण्यावर ठेका धरला. यावेळी इतर स्पर्धकांनी सुद्धा त्याच्यासोबत डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स आणि लाईक्स केल्या आहेत.

Recommended

Loading...
Share