'मिश्किल, हँडसम आणि टायमिंगचा बादशाह...' म्हणत हेमांगी कवीची दिवंगत अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्यासाठी भावूक पोस्ट

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ६४ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजलं. मराठीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर द्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान हेमांगी कवीने देखील एक खास फोटो शेयर करत प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली.

हेमांगी कवी कळव्यात राहत असताना त्यांच्या घराच्या किचनसमोर कुलकर्णी नावाचे डेंटिस्ट होते, एकेदिवशी संध्याकाळी ४ वाजता हेमांगीची आईने उंचपुऱ्या देखण्या माणसाला क्लिनिक मध्ये जाताना पाहिलं आणि हेमांगीच्या आईने हेमांगीला बोलवून घेत क्लिनिक मध्ये प्रदीप पटवर्धन आल्याचे सांगितले. यावर हेमांगीचा विश्वास बसला नाही, म्हणून ती तिथे त्यांना पाहण्यासाठी गेली असता प्रदीप पटवर्धन समोरून चालत येताना तिने पाहिलं आणि पळत येऊन तिने आईला तेच असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने शाळेत शायनिंग मारल्याचे देखील म्हटले आहे. त्यानंत हेमांगी सिनेसृष्टीत आल्यानंत तिने प्रदीप पटवर्धन यांच्यासोबत काम देखील केले आहे.

नंतर काही वर्षांनी हेमांगी आणि प्रदीप पटवर्धन यांची भेट झाली तेव्हा "मी तुम्हांला पाहिलं होतं लहानपणी" त्यावर पट्या काका म्हणाले "कुणाच्या लहानपणी?", "माझ्या की तुझ्या?" त्यावर हेमांगी म्हणाली, "अहो माझ्या" . यावर प्रदीप पटवर्धन यांनी मानेला झटका देत खास त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले, "हां मग ठीके, मी उगाच घाबरलो" 

पुढे हेमांगी म्हणते, "असा मिश्किल, देखणा आणि टायमिंगचा बादशाह पट्या काका उर्फ प्रदीप पटवर्धन! आठशे खिडक्या नवशे दार वरचा तुमचा डान्स म्हणजे ओहोहो! आम्हाला तुमची खूप आठवण येईल’ असे कॅप्शन देत हेमांगी कवीने प्रदिप पटवर्धन यांची एक खास आठवण शेयर केली आहे.

Recommended

Loading...
Share